पाॅवरहाऊस परिसरात आढळली नऊ फुटांची धामीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:37+5:302021-07-03T04:19:37+5:30
पाॅवरहाऊस परिसरात २ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धामीण निघाल्याची माहिती सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर यांना दूध विक्रेत्याने दिली. ...
पाॅवरहाऊस परिसरात २ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धामीण निघाल्याची माहिती सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर यांना दूध विक्रेत्याने दिली. यानंतर सर्पमित्राने तेथून जाऊन पाॅवर हाऊसच्या भितींच्या कडेने जात असताना त्या धामणीला पकडले. धामणीचे वजन ५ किलो असून लांबी ९ फूट आहे. १ जुलै रोजी शहरातील जि. प. कन्याशाळेत कोब्रा निघाला होता. त्यानंतर २ जुलै रोजी धामीण सापडली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने असे सरपटणारे प्राणी बेडूक व उंदरांना खाण्यासाठी बाहेर येतात. नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना माहिती द्यावी, असे आवाहन सर्पमित्राने सांगितले.
धामिणीला पाणी प्रिय
धामिणीला जास्त करून पाणी व दलदल ठिकाण प्रिय असते. नागरिकांनी आपल्या परिसरात पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचे डबके साचू देऊ नये. नगरपालिकेला सांगून पाण्याचा निचरा करायला लावावा. शुक्रवारी सापडलेली धामीण ही विषारी नव्हती, असेही सर्पमित्राने सांगितले. धामीण मोठी असल्यामुळे सर्पमित्र कल्याणकर यांनी दुसरे सर्पमित्र ओम जाधव यांना मदतीला घेतले होते.
फोटो १९