न.प.कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:56 PM2018-12-15T23:56:59+5:302018-12-15T23:57:06+5:30

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने हिंगोली येथे कर्मचाºयांनी शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील जवळपास २४० नगर परिषद व ११० नगरपंचायत कार्यालयांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 NMC workers protest movement | न.प.कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

न.प.कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने हिंगोली येथे कर्मचाºयांनी शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील जवळपास २४० नगर परिषद व ११० नगरपंचायत कार्यालयांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व सवंर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. राज्यभरातील नगर परिषद व नगर पंचायतमधील कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला निवेदन दिले होते. परंतु शासन स्तरावरून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संघटनेतर्फे कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले जात आहे. २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत काळ्याफिती बांधून काम केले जाईल असे कर्मचाºयांनी सांगितले. आंदोलनात राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, श्याम माळवटकर, बाळू बांगर, विजय शिखरे, शिवाजी घुगे, विजय इंगोले, द्रौपदाबाई हातागळे, गजानन आठवले, राम कांबळे, राजू शिखरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title:  NMC workers protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.