सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:16 IST2018-08-29T16:15:38+5:302018-08-29T16:16:30+5:30
तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल
सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या पानकनेरगाव ग्रामपंचायत सरपंचपदी तीन वर्षापूर्वी भाजप-सेना, राष्ट्रवादीचा गटाचे शंकरराव देशमुख यांची निवड झाली होती. या गटाच्या आघाडीत अडीच वंर्षाचा राजकीय समझोता झाला होता. पंरतु हा राजकीय करार पाळण्यात आला नसल्याने युतीत बिघाडी झाली . संरपच देशमुख यांना पाय उतार करण्यासाठी त्यांच्याच गटाच्या ग्रा.प.सदस्यांनी अविश्वास ठरावाचे हत्यार उपसले आहे.
एकुण पंधरा सदस्यीय ग्रामपंचायतिच्या बारा सदस्यांनी मंगळवारी सायंकाळी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे संरपच देशमुख हे विकास कामे करीत नाहीत, सदस्यांना विश्वासात न घेणे, गावात रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेत आदी कारणांमुळे अविश्वास ठराव दाखल केला.
या अविश्वास प्रस्तावावर ग्रा.प.सदस्य जयाबाई देशमुख,दिलीप झुगंरे,सुखदेव साळवे,मोनिका देशमुख,आशवणी देशमुख,संगीता देशमुख,नामदेव शिंदे,गजानन देशमुख,गणेश आकमार,वनिता देशमुख,अंजुषा अडणे,शांताबाई जोगदंड आदी बारा सदस्यांचा स्वाक्षऱ्या आहेत.