ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:10+5:302021-07-23T04:19:10+5:30
संघटनेच्या मागण्यांमध्ये पात्र ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती द्यावी, स्थायित्वाचा लाभ द्यावा, जीएसटी, ई-टेंडर, पीएफएमएस व शासकीय कपातींचे प्रशिक्षण ...
संघटनेच्या मागण्यांमध्ये पात्र ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती द्यावी, स्थायित्वाचा लाभ द्यावा, जीएसटी, ई-टेंडर, पीएफएमएस व शासकीय कपातींचे प्रशिक्षण द्या, ग्रामसेवक संवर्गाच्या लाभाच्या संचिका गहाळ झाल्याने त्या शोधाव्या, मासिक वेतन वेळेवर द्यावे, निलंबन कालावधी निश्चित करावा, कोरोनाने मयत ग्रामसेवकांचा विमाकवच प्रस्ताव शासनास पाठवावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व जीपीएफच्या स्लिप द्याव्यात, एनपीएसचा हिशेब द्यावा, सहाव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करावा, आदर्श पुरस्कार वेतनवाढ, अंतर्गत जिल्हा बदली आगाऊ वेतनवाढ यासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण न झाल्याने २२ जुलैपासून कंत्राटी ग्रामसेवकवगळता इतरांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. यात ग्रा.पं.स्तरावरील दैनंदिन कामे व कोरोनाविषयक कामे तेवढी केली जाणार आहेत. मात्र पं.स., जि.प.चे अहवाल, बैठकांवर बहिष्कार राहणार आहे. अभिलेखेही तपासणीस दिले जाणार नसल्याचे निवेदनात म्हटले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सरचिटणीस राजेश किलचे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.