कयाधूचे थेंबभरही पाणी नांदेडला नेऊ देणार नाही : शिवाजी माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:10+5:302021-06-28T04:21:10+5:30
माने म्हणाले की, नांदेड येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरण केले. यामध्ये ...
माने म्हणाले की, नांदेड येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी पाॅवर पॉइंट सादरीकरण केले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पैनगंगा नदीत पाणी वळविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी त्यांनी सापळी धरणाच्या माध्यमातून हे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा खरबी बंधाऱ्यातून पाणी वळविण्याचे मनसुबे आहेत. आधीच हिंगोली जिल्ह्यावर सिंचन अनुशेषातही अन्याय झाला आहे. ४०००० हेक्टरचा अनुशेष असताना साडेसतरा हजार हेक्टरचा मंजूर झाला आहे. त्यावर शासन काहीच विचार करीत नाही, उलट येथील पाणी पळवून हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट बनविण्याचा घाट घातला जात आहे. तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा माने यांनी दिला आहे. कायम नांदेड जिल्ह्याचा विचार करणाऱ्या चव्हाण यांनी हिंगोली जिल्ह्यालाही समान वागणूक देणे गरजेचे आहे. मतांचे राजकारण करताना इतरांचे जीवन प्रभावित होणार नाही, याची काळजी नेता म्हणून त्यांनी घेणे अपेक्षित आहे.