..अन् रोपवाटिकेतच नाही ‘रोपांचा’ ताळमेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:47 AM2018-07-15T00:47:12+5:302018-07-15T00:48:06+5:30
राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. वन विभागाने जागो-जागी उभारलेल्या स्टॉलवरही रोपे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.
दयाशील इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगण्यात आले. वन विभागाने जागो-जागी उभारलेल्या स्टॉलवरही रोपे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.
पर्यावरण संतुलनासाठी शासनाकडून वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व नागरिकही यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत. परंतु जिल्ह्यात वृक्षलागवडीसंदर्भात वन विभागाकडे माहितीच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. हिंगोली येथील खटकाळी बायपास परिसरात वन विभागाची रोपवाटिका आहे. दरवर्षी रोपवाटिकेत जवळपास पावणेदोन लाख रोपांची उगवण केली जाते. यावर्षी लाखो रोपांची लागवड करण्यात आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र या रोपवाटिकेत किती रोपांची उगवण केली, किती वाटप झाली, यासह इतर माहितीच संबधित अधिकाऱ्याकडे उपलब्ध नसल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे शतकोटी वृक्षलागवड नावालाच तर होत नाही, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून, रोपवाटिकेतील नियोजन लावणेही महत्त्वाचे आहे.
३१ जुलै अहवाल मिळेल
४रोपवाटिकेतील रोपांची संख्या, उगवण केलेली रोपे, वाटप झालेली रोपे अशी माहिती ३१ जुलैला एकत्रित केली जाणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. बी. देवरे यांनी सांगितले. तसेच येथील महिला कामगारांचे मागील चार महिन्यांपासून मानधन रखडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
बिया आणून रोपे तयार
४रोपवाहिकेतील महिला कामगारांनी बिया आणून लाखो रोपे तयार केली. जिवापाड रोपांची कामगारांकडून देखरेख केली जात असल्याचे दिसून आले. सध्या लिंब रोपाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या रोपवाहिकेत बांबू, शिसम, चिंच, शिसू, कवठ, बेल, पिंपळ, गोंदन, हिरडा, कड, करंज, लिंब अशी जातवार रोपे असल्याचे त्यांनी सांगितले.