३७ गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:26+5:302021-01-03T04:30:26+5:30
या प्रशिक्षणासाठी हिंगोली तालुक्यातील एकूण १,४०० कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत व मतदान यंत्राचे प्रशिक्षण ...
या प्रशिक्षणासाठी हिंगोली तालुक्यातील एकूण १,४०० कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत व मतदान यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनही केले, तसेच मतदान यंत्राची प्रत्यक्ष हाताळणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर काही अडचणी वाटत असल्यास त्या मास्टर ट्रेनरकडून दूर करून घेण्यास सांगण्यात आले होते. त्याचाही लाभ कर्मचाऱ्यांनी घेतला. या प्रशिक्षणाला एकूण ३७ जण गैरहजर होते. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले असून, गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५, अशा दोन सत्रांत प्रशिक्षण पूर्ण झाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गणेश शिंदे, एकनाथ कऱ्हाळे, बालाजी काळे, अण्णासाहेब कुटे, विजय बांगर, मुकुंद पवार आदींनी मार्गदर्शन केले.