व्यवस्थापकास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:46 AM2018-06-19T00:46:47+5:302018-06-19T00:46:47+5:30

येथील महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी यंदा वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण ठेवल्यामुळे ‘आपली वेतनवाढ कायमस्वरुपी का रोखण्यात येऊ नये’ अशी नोटीस वरिष्ठांनी बजावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 Notice to the manager | व्यवस्थापकास नोटीस

व्यवस्थापकास नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी यंदा वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण ठेवल्यामुळे ‘आपली वेतनवाढ कायमस्वरुपी का रोखण्यात येऊ नये’ अशी नोटीस वरिष्ठांनी बजावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यू.जी. वाघमारे यांनी भर उन्हात फिरुन कार्यालयानी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाहिजे तसा लाभार्थ्यांकडून प्रतिसादच मिळाला नाही. आता वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्यावरच वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. हिंगोली जिल्ह्याचे ४ कोटी २२ लाख ९३ हजार रुपये एवढे वसुलीचे उद्दिष्ट असताना सन २०१७- १८ मध्ये केवळ ४.०२ लाख एवढीच वसुली झाली. लाभार्थ्यांच्या मागे अनेकदा फिरुनही लाभार्थ्यांनी रक्कम भरण्यास प्रतिसादच न दिल्याचा फटका मात्र जिल्हा व्यवस्थापकास बसला आहे.
याबाबत वाघमारे म्हणाले की, मी यावर काय प्रतिक्रिया देणार? मी माझ्या परीने तर १00 टक्के प्रयत्न केले. मात्र लाभार्थीच कर्ज भरत नाहीत. त्यामुळे मला नोटीस मिळाली. मात्र इतरांनाही कर्ज मिळत नाही. सर्वांचेच नुकसान टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी कर्ज भरून सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title:  Notice to the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.