व्यवस्थापकाला संघाकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:26 PM2018-09-28T23:26:31+5:302018-09-28T23:26:59+5:30

खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर सोयाबीन विकणाऱ्या शेतकºयांची थकलेल्या रक्कमेसाठी जबाबदार असणाºया व्यवस्थापकास संघाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत ही रक्कम भरा अन्यथा कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा दिला आहे.

 Notice from the manager to the team | व्यवस्थापकाला संघाकडून नोटीस

व्यवस्थापकाला संघाकडून नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर सोयाबीन विकणाऱ्या शेतकºयांची थकलेल्या रक्कमेसाठी जबाबदार असणाºया व्यवस्थापकास संघाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत ही रक्कम भरा अन्यथा कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा दिला आहे.
चुकारे मिळत नसल्याच्या कारणावरून खरेदी-विक्री संघाच्या नावाने मागील वर्षभरात अनेकदा बोंब झाली. शासनाकडूनही रक्कम वेळेत मिळत नसल्याने संघाचाही काही वेळा नाईलाज होता. मात्र शासनाकडून रक्कम अदा झाली तरीही शेतकºयांच्या पदरात ती न पडल्याच्या तक्रारींमुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला होता. यात खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक प्रकाश नारायण पवार यांना वैयक्तिक जबाबदार धरून त्यांनी ही रक्कम अदा करावी, असा अहवाल सहायक निबंधकांनी दिला होता.
सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील शंकर गंगाराम गाडे, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवराम गणपती जगताप, पहेणीचे विठ्ठल पांडुरंग करंडे व गिरजा झाडे यांनी सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केलेली होती. त्यातच काही जणांकडे व्यवस्थापकांचे वैयक्तिक खात्याचे धनादेश असून तेही रक्कम नसल्याने वटले नव्हते. त्यामुळे सहायक निबंधकांनी लेखा परीक्षकामार्फत केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर खरेदी विक्री संघानेही व्यवस्थापक पवार यांना नोटीस दिली आहे.
गैरव्यवहारामुळे ज्या शेतकºयांची रक्कम देणे बाकी आहे, अशांची रक्कम सात दिवसांत अदा करण्यास नोटिसीत बजावल्याचे संघाचे उपाध्यक्ष उमेश नागरे यांनी सांगितले. अन्यथा याबाबतच्या कारवाईचा प्रस्ताव निबंधकांकडे पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title:  Notice from the manager to the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.