आचारसंहितेबाबत अधिका-यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:00 AM2019-09-14T00:00:59+5:302019-09-14T00:01:23+5:30

१२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी करीता बैठक घेण्यात आली.

 Notice to the Officers regarding the Code of Conduct | आचारसंहितेबाबत अधिका-यांना सूचना

आचारसंहितेबाबत अधिका-यांना सूचना

googlenewsNext

हिंगोली : १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी करीता बैठक घेण्यात आली.
निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या व्हीएसटी, एफएसटी, एसएसटी, व्हीव्हीटी पथकातील नोडल अधिकाऱ्यांची बैठक उपविभागी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत पथकातील अधिकाºयांना आदर्श आंचार संहितेच्या काटेकोर पालनाविषयी त्यांनी माहिती सांगितली. आचार संहितेचा उप विभागात कोठेही प्रकारे भंग होणार नाही, याची दक्षता कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओंची बैठक घेऊन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी मार्गदर्शन केले. निवडणूकीमध्ये बीएलओ यांचे मतदान केंद्रावरील महत्व त्यांनी समजावून सांगितले. बैठकीस तहसीलदार गजानन शिंदे, मधुकर खंडागळे, जी.एस. खोकले, टी.डी. कुबडे आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Notice to the Officers regarding the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.