आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:39+5:302021-06-25T04:21:39+5:30
२३ मार्च २०१९ पासून सर्वच जण कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहेत. आता कोरोना महामारी कमी झाली असली तरी पावसाळ्याचे ...
२३ मार्च २०१९ पासून सर्वच जण कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहेत. आता कोरोना महामारी कमी झाली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्याने कानांना बुरशी, बॅक्टेरिया या रोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात जास्तीच्या ओलाव्यामुळे बुरशी, बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यास दोन्ही कान कपड्याने स्वच्छ करून घ्यावेत. कानांमध्ये खाज येत असल्यास कानकोरणे, गुलाची काडी टाकून कानातील मळ काढणे, हे टाळावे. डाॅक्टरांनी सांगितल्याशिवाय कोणतीही औषधी मनाने घेऊ नये. कारण ते कानांसाठी हितावह नसते. कानांतून पाणी येत असल्यास तातडीने डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
शहरातील नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाचा धोका जास्त असतो. सद्य:स्थितीत पावसाचे दिवस असून पावसात भिजणे नागरिकांनी टाळावे. पाऊस येत असल्यास शेतातील वा अंगणातील कामे लवकरात लवकर कशी आटोपतील, हे पाहावे.
पावसात भिजल्यामुळे कानात ओलसरपणा येतो. कान खाजवू लागल्यास काही जण कानकोरणाने कान साप करतात. त्यातील मळ काढून टाकतात. परंतु, हे कानासाठी धोकादायकच असे आहे. कानाला खाज येत असल्यास लगेच तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे त्याच्यासाठी फायद्याचेच आहे.