आता विनाकारण फिराल तरीही दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 08:17 PM2020-06-24T20:17:32+5:302020-06-24T20:18:07+5:30
मास्क न वापरले तर २ हजार दंड
हिंगोली : जिल्ह्यात मास्कचा वापर न करताच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणतीच उपाययोजना न करणा-यांना पूर्वी ५00 रुपयांच्या दंडाचे आदेश होते. आता जिल्हाधिका-यांनी हा दंड तब्बल दोन हजारांवर नेला आहे. विनाकारण फिरल्यासही दंड लागेल. तर यात लोकप्रतिनिधींनाही सोडले नाही.
न.प., ग्रा.पं. व संबंधित शासकीय विभाग व पोलिसांनी या दंडात्मक बाबींची अंमलबजावणी करायची असून त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सुधारित आदेश काढले आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी जसे रस्ते, बाजार, रुग्णालये, कार्यालये आदी ठिकाणी थुंकल्यास प्रथम हजार, दुसºयांदा फौजदार कारवाई केली जाईल. चेहºयावर मास्क न वापरणे व तोंड सुरक्षितपणे झाकलेले नसणे यासाठी दोन हजारांचा दंड व दुसºयांदा घडल्यास फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था गरजूंना मदत वाटप करताना हा नियम पाळत नसल्याचे आढळून आल्याचेही त्यात म्हटले आहे. दुकानदार, फळ, भाजीपाला विक्रेते व सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदींसह ग्राहकांनी सामाजिक अंतर न पाळणे, दोन ग्राहकांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर न राखणे, विक्रेत्यांनी मार्किंग न करणे यासाठी दोनशे रुपये दंड ग्राहकास लावला जाणार आहे. तर अस्थापना मालकास दोन हजार लावला जाणार आहे. दुसºयांदा आढळल्यास फौजदारी केली जाईल. किराणा, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दरपत्रक न लावल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे. तर दुसºयांदा फौजदारी केली जाईल. सार्वजनिक स्थळी, रस्ते, बाजार, भोजनालय, कार्यालय आदी ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळल्यास एक हजार दंड, दुसºयांदा आढळल्यास फौजदारी केली जाईल. एखादी व्यक्ती दुचाकीवरून भाजीपाल, किराणा किंवा औषधी नेत असल्याची बतावणी करून अनावश्यक फिरत असल्यास एक हजार रुपये दंड व दुसºयांदा फौजदारी कारवाई करण्यात येईल.
मंगल कार्यालयांना अटींवर परवानगी
मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ साजरा करण्यासाठी अटी व शर्तींनुसार परवानगी देण्यात आली आहे. याकरिता वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. यामध्ये जास्तीत-जास्त ५0 लोकांच्या उपस्थितीत समारंभ साजरा करता येईल. सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. या समारंभावेळी मंगल कार्यालयात सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. वातानुकूलित मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी नाही. समारंभ साजरा करण्यापूर्वी व नंतर निर्जुंतीकरण करावे. याची जबाबदारी मंगल कार्यालय मालक, वधू-वर पक्षावर असेल.