आता व्हॉटसअॅपवर ‘द्या’ अवैध धंद्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:25 AM2018-08-13T01:25:57+5:302018-08-13T01:26:13+5:30
पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तरीही अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या, व्हॉट्सअपवर फोटो टाका तातडीने त्यावर पोलिस कारवाई केली जाणार. असे बाळापूर ठाण्याचे सपोनि ओमकांत चिंचोलकर सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तरीही अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या, व्हॉट्सअपवर फोटो टाका तातडीने त्यावर पोलिस कारवाई केली जाणार. असे बाळापूर ठाण्याचे सपोनि ओमकांत चिंचोलकर सांगितले.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे. येथे नव्याने रुजू झालेले दबंग सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेला थेट आवाहन केले आहे.
अवैध धंद्या विरुद्धच्या मोहिमेत जनतेने पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले असून कोणत्याही कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना कळवावी. तसेच ८४५९१३८९६३ या क्रमांकावर फोन करावा अथवा व्हॉट्सअँप द्वारे अवैध धंद्याची फोटो पाठवावा, ही माहिती गुपित ठेवून सदर धंद्याविरुद्ध पोलीस थेट कारवाई करणार आहेत. याबाबत संबंधित पोलीस कर्मचाºयांना सूचनाही दिल्या आहेत. विशेष म्हणजे गोपनीय पद्धतीनेही अवैध धंदे सुरूच असतील तर पोलिसांना तातडीने कळविण्याचे आवाहनही आखाडा बाळापूर पोली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे.