आता नरकयातना असह्य झाल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:06 AM2018-08-19T00:06:15+5:302018-08-19T00:06:38+5:30

आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

 Now hell becomes unbearable! | आता नरकयातना असह्य झाल्या!

आता नरकयातना असह्य झाल्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.
कळमनुरी तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या करवाडी येथील रस्त्याचा व गावातील सुविधांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. वारंवार निवेदने, आंदोलन व मोर्चे काढूनही या गावातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे १८ आॅगस्ट रोजी परत करवाडी येथील गावकºयांनी २५ किमी पायी चालत हिंगोली गाठली.
सकाळी ९ वाजता निघालेले मोर्चेकरी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा कचेरीवर धडकले. लेकराबाळांसह, महिला, पुरूष व विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावाचा संपर्क तुटला होता. ही नित्याचीच बाब आहे. शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मानव विकास बसच माहित नाही. गावात येण्यासाठी रस्ताच नसल्याने करवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.
प्रसूतीदरम्यान गरोदर मातांची होणारी हेळसांड, तसेच गंभीर रूग्णाला बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी ऐनवेळी रस्त्याअभावी वाहनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे किती दिवस ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी मोर्च्यादरम्यान उपस्थित केले. करवाडी गावाला रस्ता करून द्यावा, गावात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
न्याय : उच्च न्यायालयाने दखल घेतली
कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावच्या रस्त्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सु-मुटो याचिका दाखल केली. जिल्हा प्रशासनाकडूनही करवाडी रस्त्याबाबत खुलासा मागविला होता. परंतु याबाबत अद्याप जि. प. व जिल्हा प्रशासनाने कुठलीही कार्यवाही
केली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. परत शिनिवारी जिल्हाधिकाºयांना करवाडी येथील रस्ता व गावातील सुविधा याबाबत निवेदन सादर केले आहे. जि.प.लाही निवेदन सादर केले आहे, असे भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी सांगितले.
रस्त्याअभावी करवाडीत रूग्णवाहिका येत नाहीत. ना खाजगी वाहने येण्यास तयार होतात. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ रोजी गरोदर मातेला खाटेवर ३ किमी प्रवास करावा लागला. हा नेहमीचाच प्रक्रार असल्याचे गावकरी सांगत होते.
पायी गाठली हिंगोली
४रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी येथील आदिवासी समाजबांधव लहान-मुलांबाळासह करवारी ते हिंगोली पायी चालत आले. २५ किमी. अंतर पार करत मोर्चेकरी जिल्हा कचेरीसमोर जमले. यावेळी संघटनेतर्फेच मोर्चात सहभागी झालेल्यांना खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title:  Now hell becomes unbearable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.