आता ग्रामीण स्वच्छ सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:15 AM2018-08-11T00:15:52+5:302018-08-11T00:16:16+5:30

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१८ या केंद्र शासनाच्या उपक्रमात जि.प.तील षटकोनी सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोणते उपक्रम राबवायचे, याची माहिती देण्यात आली. १ ते ३१ आॅगस्ट या काळात हा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने स्वच्छ सर्व्हेक्षण अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.

 Now rural clean survey | आता ग्रामीण स्वच्छ सर्व्हेक्षण

आता ग्रामीण स्वच्छ सर्व्हेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१८ या केंद्र शासनाच्या उपक्रमात जि.प.तील षटकोनी सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोणते उपक्रम राबवायचे, याची माहिती देण्यात आली. १ ते ३१ आॅगस्ट या काळात हा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने स्वच्छ सर्व्हेक्षण अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, सदस्य डॉ.सतीश पाचपुते, विठ्ठल चौतमल, राजेंद्र देशमुख, रामराव वाघडव, एकलारे, जुमडे, दिलीप घुगे यांची उपस्थिती होती. यावेळी रसाळ यांनी सर्व्हेक्षणात असलेल्या गुणतक्त्याची माहिती दिली. तसेच अनुभवकथन केले.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून हिंगोली न.प.चे सीओ रामदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. हिंगोली शहरात हा उपक्रम राबविताना आलेल्या अडचणी व उपक्रम यशस्वी करण्यासाठी करावयाचे उपाय याची माहिती दिली.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे यांनीही माहिती दिली. केंद्र शासनाकडून निवडलेल्या सर्वेक्षण संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे निरीक्षण केले जाणार आहे. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणी आदींचा यात समावेश असेल. गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छागृही, ग्रा.पं. सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा, शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील. तर यामध्ये प्रत्येक गावात दहा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेण्यासही सांगण्यात आलेले आहे.
नागरिकांचा असा सहभाग हवा
यात निवडलेल्या गावात मोबाईलधारकांनी एसएसजी १८ हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर व्होटिंग करावी, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा, कचराकुंडीचा वापर करावा, शौचालयाचा वापर करावा. याशिवाय अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे येथील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

Web Title:  Now rural clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.