आता कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:31 AM2021-05-19T04:31:29+5:302021-05-19T04:31:29+5:30
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.१५ लाख जणांचे लसीकरण झालेले आहे. मात्र यादरम्यान अनेकदा लसीकरणाचे नियम बदलत गेले. सुरुवातीला फक्त आरोग्य ...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.१५ लाख जणांचे लसीकरण झालेले आहे. मात्र यादरम्यान अनेकदा लसीकरणाचे नियम बदलत गेले. सुरुवातीला फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली. नंतर फ्रंटलाइन वर्कर आले. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ, नंतर ४५ वर्षांवरील गंभीर आजारी व काही दिवसांनी ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचे जाहीर केले. तरीही लसींचा पुरवठा होत नव्हता. त्यानंतर अचानक १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले. सगळीकडेच लस घेण्यासाठी रांगा लागल्या. तरुण वर्गाची संख्याही जास्त आहे. शिवाय लसीकरणासाठी या मंडळीचा उत्साहही तेवढाच दांडगा होता. त्यानंतर त्या तुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास दुसऱ्या डोसची अडचण होईल, या भीतीने १८ ते ४५ वर्षांच्या लोकांचे लसीकरणच थांबविले आहे. ४५ ते ५६ दिवसांपर्यंत कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यास सांगितले होते. आता ८४ दिवसांवर नेले आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे म्हणाले, मागील दोन दिवसांपासून या वेबसाइटवर दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी ८४ दिवसांचा नियम लागू झाला आहे. त्यापूर्वी अपॉइंटमेंटच मिळत नाही. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी रांगेत लागणाऱ्यांनी नाहक वेळ वाया न घालता ८४ दिवसांनंतर येण्याची आवाहनही त्यांनी केले. या नव्या नियमामुळे अनेकजणांना आता पुन्हा जवळपास महिनाभराचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुरुवातीला तर २८ दिवसांनंतरच दुसरा डोस देण्यात आला होता. वारंवार बदलणाऱ्या या नियमांमागे खरेच शास्त्रीय कारण आहे की, लसींचा तुटवडा असल्याने असा बदल होतोय? असा सवाल केला जात आहे.