आता मोजणीचा नवा वाद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:50 AM2018-03-01T00:50:02+5:302018-03-01T00:50:08+5:30

वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या व संपादीत केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजत आहे. तक्रारी वाढल्याने मोजणीची टुम निघाली प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली मात्र नगर पालिकेला मालमत्ता वाचवण्यासाठी मोजणी करायची कि निवळ वेळ काढूपणा करायचा असा नवा वाद आता समोर आला आहे. बुधवारी मोजणीच्या वेळी अनेक सदस्य व नागरिक हजर होते. मात्र तांत्रीक कारणाने मोजणी बंद पडली व आता पुन्हा नव्या तारखा देवून मोजणी होणार असल्याचे जाहीर झाले.

 Now start counting new dispute | आता मोजणीचा नवा वाद सुरू

आता मोजणीचा नवा वाद सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या व संपादीत केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजत आहे. तक्रारी वाढल्याने मोजणीची टुम निघाली प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली मात्र नगर पालिकेला मालमत्ता वाचवण्यासाठी मोजणी करायची कि निवळ वेळ काढूपणा करायचा असा नवा वाद आता समोर आला आहे. बुधवारी मोजणीच्या वेळी अनेक सदस्य व नागरिक हजर होते. मात्र तांत्रीक कारणाने मोजणी बंद पडली व आता पुन्हा नव्या तारखा देवून मोजणी होणार असल्याचे जाहीर झाले.
वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या सर्व्हे नं. १८० मध्ये बोगस कागदपत्राद्वारे भुखंड खरेदी विक्री झाल्याचा व नगर पालिकेतून संचीकाच गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. अनेक सदस्यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रारीही केल्या; मात्र अद्याप काहीच झालेले नाही.
सर्व्हे नं. १५० हा नगर पालिकेने संपादित केलेला ४ एकर २७ गुंठे जमिनीचा असाच घोळ सुरू आहे. नगर पालिकेच्या या जागेवर खाजगी व्यक्तींचा कब्जा झाला आहे. पेट्रोलपंपही झाला आहे. तर अनेकांनी पक्के बांधकाम करून घेतले आहेत. मुख्याधिकाºयांनी तर नगरपालिकेच्या जागांवर घर नंबर देऊन ही जमीनच खाजगी व्यक्तीच्या घशात घातल्याच्या प्रकार केला आहे. या दोन्ही जमिनीवरून प्रचंड वादळ सुरू आहे. तक्रारी वाढत चालल्याने प्रकरण थंड करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याची टूम काढली. मोजणी फी भरण्यात आली. दोन दिवसांपूर्वी सर्वे नं. १८० ची मोजणीसाठी भुमीअभिलेखचे कर्मचारी आले. सोबत न.प. अभियंता चव्हाणही होते. मात्र जे भुखंड गिळकृत केले त्या जागा ‘सेफ’ होतील, अशा पद्धतीने मोजणीचा प्रकार होत असल्याच्या तक्रारीवरून काही सदस्यांनी मोजणी बंद पाडली.
बुधवारी सर्व्हे नं. १५० च्या मोजणीसाठी पथक आले मात्र नगर पालिकेने न.प.ची चार एकर २७ गुंठे जागा मोजणी ऐवजी भलत्याच मार्गाने मोजणी सुरू करण्यास भाग पाडल्याने वाद सुरू झाला.
मुख्याधिकारी आले : हद्दच कळेना
न.प.चे उपाध्यक्ष खैसर अहेमद, वैजनाथ गुंडाळे, अजगर पटेल, दिलीप भोसले, सीताराम म्यानेवार, दिवाकर पुंडगे, संजय भोसले आदींनी मोजणी व्यवस्थित करवून घेण्यासाठी मुख्याधिकाºयांना पाचारण केले. मात्र मुख्याधिकाºयांना न.प.ची जागा व हद्दच माहीत नसल्याचा प्रकार पाहावयास मिळाला.
शेवटी सदस्य आक्रमक झाल्याने विश्रामगृहापासून मोजणी करण्यावर एकमत झाले. तोवर मोजणी मशीनची बॅटरी डिस्चार्ज झाली व मोजणीचा खोळंबा झाला आहे. आता पुन्हा मोजणीची तारीख मिळणार असल्याचे जाहीर झाले.
दिवसभराच्या वाद, चर्चा व घोळानंतरही नगर पालिकेला जागा वाचवयाच्या कि नुसता वेळकाढूपणा करायचा हेच स्पष्ट झाले नाही. परिणामी उपस्थित सदस्यांनी तिव्र भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून शासनाची मालमत्ता वाचवावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Web Title:  Now start counting new dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.