आता सभा ठरली तरीही अडचण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:40 AM2018-02-24T00:40:14+5:302018-02-24T00:40:25+5:30

हिंगोली : येथील नगरपालिकेत सभापती निवडीच्या सभेवरून आधी संभ्रमावस्था होती. आता ती घेण्याची तारीख निश्चित झाली तर मुुस्लिम नगरसेवक औरंगाबाद येथे होणा-या भव्य इज्तेमाच्या कार्यक्रमाला गेल्याने ते न.प.सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे सभा लांबणीवर टाकण्याची मागणी होत असून, प्रशासनाची नोटीस न मिळाल्याने ती करताही येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

 Now, when the meeting is held, the problem persists | आता सभा ठरली तरीही अडचण कायम

आता सभा ठरली तरीही अडचण कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील नगरपालिकेत सभापती निवडीच्या सभेवरून आधी संभ्रमावस्था होती. आता ती घेण्याची तारीख निश्चित झाली तर मुुस्लिम नगरसेवक औरंगाबाद येथे होणा-या भव्य इज्तेमाच्या कार्यक्रमाला गेल्याने ते न.प.सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे सभा लांबणीवर टाकण्याची मागणी होत असून, प्रशासनाची नोटीस न मिळाल्याने ती करताही येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
हिंगोली पालिकेत सभापती निवडीचा मुद्दा अंतर्गत वादातून समोर आला. मात्र ही निवड प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण न झाल्याने त्यात राजकीय दबावाचा आरोप झाला. आता या प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकाºयांनी २६ फेब्रुवारी ही तारीख काढल्यानंतर नगरसेवक मंडळींची ओरड सुरू झाली. एकतर अद्याप याची न.प.त अथवा नगरसेवकांनाच माहिती नाही. आमच्या पक्षाचे दोन नगरसेवक असून त्यांना अजून सभेबाबत माहिती नसल्याचे मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांनी सांगितले. तर या प्रक्रियेच्या गोंधळाला कुणी जबाबदार आहे की नाही? चाकोरी मोडली गेल्यास त्याच्यावर कुणाचे नियंत्रण? असेही ते म्हणाले. तर शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक म्हणाले, या सभेला आधीच विलंब झालेला आहे. आता सभा ठरली तरीही मुस्लिम बांधवांचा पवित्र इज्तेमा औरंगाबादला असल्याने या समाजाच्या जवळपास नगरसेवक/ नगरसेविका तिकडे गेल्याने उपस्थितीची समस्या आहे. त्यामुळे ही सभा लांबविण्याची गरज आहे. मात्र न.प.त या सभेबाबतच काही माहिती नसल्यामुळे तशी मागणीही करता येत नसल्याचे ते म्हणाले. तर नगरसेवक माबुद बागवान व आरेफ लाला यांनीही इज्तेमाच्या कार्यक्रमासाठी नगरसेवक जात असल्याने न.प.ची सभापती निवडीची सभा लांबली पाहिजे, अशी मागणी केली.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी सभा लांबविण्यास कुणाचीही लेखी मागणी आली नसल्याचे सांगितले. तर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार २६ रोजी १२ वा. सभा सुरू होणार असून अर्ज १0 ते १२ या वेळेत भरावे लागतील. मात्र महाराष्ट्र न.प., न.पं. नियम २00६ नियम २ (३) अन्वये आलेली बैठक रद्द किंवा तहकूब करता येणार नसल्याची टिपही त्यात टाकण्यात आलेली आहे.
हिंगोली नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा २७ फेब्रुवारी रोजी आहे. या सभेची नोटीस नगरसेवकांना मिळाली आहे. मात्र यात सोबतचे जोडपत्रच दिले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमके काय राहणार आहे, याचा काहीच मेळ नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे या अर्थसंकल्पाचा अभ्यास कधी करायचा? असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.

Web Title:  Now, when the meeting is held, the problem persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.