पोलीस बंदोबस्तात न.प.ची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:27 AM2018-08-25T01:27:05+5:302018-08-25T01:27:24+5:30
येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली.
३० जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष व विरोधी गटातील सदस्यांमध्ये वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही गेला होता. ती तहकूब केलेली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पोलीस बंदोबस्त घेण्यात आली. ३० जुलै रोजीच्या सभेत काही ठरावावर वाद उद्भवला होता. त्यामुळे या सभेत वाद होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. यावेळी ३० जुलैच्या ठरावावरच चर्चा करण्यात आली. काही ठराव सर्वांनुमते मंजूर झाले. विशेष सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक डी.ए. गव्हाणकर व सर्व नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती.