न.प.त यंदा समित्यांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:27 AM2018-02-03T00:27:21+5:302018-02-03T00:27:46+5:30

नगरपालिकेच्या ६ फेब्रुवारी रोजी होणाºया विशेष सभेत यंदा समित्या स्थापनेसाठी नगरसेवक आग्रह धरतील, अशी परिस्थिती दिसून येत आहे. काही नगरसेवकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. ही मंडळी ठाम राहिली तर गेल्या अनेक वर्षांपासूनची समित्या स्थापन न करण्याची परंपरा खंडित होवू शकते.

 NPP discusses this time in the committee | न.प.त यंदा समित्यांची चर्चा

न.प.त यंदा समित्यांची चर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या ६ फेब्रुवारी रोजी होणा-या विशेष सभेत यंदा समित्या स्थापनेसाठी नगरसेवक आग्रह धरतील, अशी परिस्थिती दिसून येत आहे. काही नगरसेवकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. ही मंडळी ठाम राहिली तर गेल्या अनेक वर्षांपासूनची समित्या स्थापन न करण्याची परंपरा खंडित होवू शकते.
हिंगोली नगरपालिकेत मागील अनेक वर्षांपासून समित्या स्थापन न करता सर्वसाधारण सभेसमोरच सर्व बाबी आणण्याची अलिखित परंपरा आहे. जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी कारभार हाती घेतल्यानंतरही ही परंपरा कायम राहिली. राष्ट्रवादीकडे चांगले संख्याबळ असल्याने इतरांच्या मदतीने ते समित्या स्थापनेची भूमिका घेतील, असे वाटत असतानाच या बैठकीकडे गतवर्षी कोणी फिरकलेच नव्हते. यंदाही आता काहीजण यासाठी ताणाताणी करीत फिरताना दिसत आहेत. या मंडळींना मात्र त्यासाठी इतर पक्षांची साथ मिळणे गरजेचे आहे. अन्यथा ठरावीक जणांच्या भरवशावर अशी धिटाई करणे जोखमीचे ठरणार आहे. शिवाय नगरपालिकेत आतापर्यंत सर्वांना घेवूनच कारभार चालत आल्याने काही नगरसेवकांचीच दिसत असलेली नाराजी इतरांच्याही मनात आहे की नाही, हे कळायला मार्ग नाही. अशांना अधिकाराचे विकेंद्रीकरण होण्यासाठी या समित्यांची गरज भासू लागली आहे. ते इतरांना पटवू लागल्याामुळे ही चर्चा प्रत्यक्षात उतरल्यासही नवल नाही.
अजून तरी याबाबत नेतेमंडळी अथवा पालिकेतील दिग्गज मंडळी काहीच बोलत नसून आता ६ फेब्रुवारीलाच नेमके काय होईल तेव्हाच कळणार आहे.
सर्वसाधारण सभा : विविध ठराव
५ फेब्रुवारी रोजी न.प.ची सर्वसाधारण सभाही होणार आहे. यात विविध रस्त्यांची कामे, रात्र निवाºयासाठी जागा भाड्याने घेणे, युजर चार्जेस कर लावणे, अनधिकृत नळास लावलेल्या दंडाबाबत निर्णय घेणे, न.प.च्या अभ्यासिका केंद्रास शुल्क आकारणे, विविध विभागातील वार्षिक निविदा,
नगरोत्थान योजनेत बिरसा मुंडा चौक ते एमजीपी पाण्याच्या टाकीपर्यंत हॉटमिक्स रस्ता तयार करणे, रमाई घरकुलचे अर्ज मंजुरीसाठी पाठवणे, विविध चालू कामांना मुदतवाढ, डम्पिंग ग्राऊंडला वीजपुरवठा, शेतकी भवन बांधकाम आदी विषय आहेत.
६ रोजी ११ वाजता उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता स्थायी व इतर समित्यांची निवड करण्यास सभा बोलावली आहे. यात समित्या, सदस्यसंख्या आदी बाबी ठरणार आहेत.

Web Title:  NPP discusses this time in the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.