सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:38 AM2021-04-30T04:38:02+5:302021-04-30T04:38:02+5:30
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १२ हजार ४७० रुग्ण आढळले. तर १० हजार ९४७ बरे झाले. सध्या १२९६ जणांवर ...
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १२ हजार ४७० रुग्ण आढळले. तर १० हजार ९४७ बरे झाले. सध्या १२९६ जणांवर विविध कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ४४० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे तर ३९ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.
सहा जणांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात वसमत तालुक्यातील आडगाव येथील ६० वर्षीय पुरुष, सेनगावचा ३२ वर्षीय पुरुष व जडगावचा ५५ वर्षीय पुरुष अशा तिघांचा मृत्यू झाला. नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये मंगळवाऱ्यातील ५५ वर्षीय पुरुष तर सेनगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. कोरोना केअर सेंटर वसमत येथे गिरगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आतापर्यंत २२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.