रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:44+5:302021-07-30T04:31:44+5:30
हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून प्रवाशांच्या मागणीनुसार ‘डेमो’ ही पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. इतर एक्सप्रेस रेल्वेही ...
हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून प्रवाशांच्या मागणीनुसार ‘डेमो’ ही पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. इतर एक्सप्रेस रेल्वेही सुरु आहेत. परंतु, थांबे मात्र वाढलेली नाहीत. प्रवासी संख्या वाढल्यास रेल्वे विभाग थांब्याबाबत निर्णय घेईल, असे स्टेशनमास्टर अलोक यांनी सांगितले.
कोरोना महामारी अजून संपलेली नाही. रोजच्या रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाआधी सारखी प्रवासी संख्याही सध्या नाही. रोज ५० ते ६० प्रवासी हे प्रवास करताना आढळून येत आहेत. मध्यंतरी पॅसेंजर गाडी नाही म्हणून प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरु केली आहे. परंतु, प्रवासी मात्र या ‘डेमो’ गाडीला मिळत नाहीत. रेल्वे विभागाने ज्या ठिकाणी थांबे दिले आहेत त्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहेत. रेल्वेच्या सुचनेनुसार पुढील बंद असलेले थांबे सुरु होतील.
सध्या सुरु असलेल्या रेल्वे
नरखेड ते काचीगुडा
तितरुपती ते अमरावती
नांदेड ते श्रीनगर
नांदेड ते अमृतसर
इंदोर ते यशवंतपूर
अजमेर ते हैदराबाद
जयपूर ते हैदराबाद
कोल्हापूर ते नागपूर
थांब्याबाबतचा निर्णय रेल्वे विभाग घेणार...
कोरोना काळापासून काही थांबे बंद करण्यात आलेली आहेत. या थांब्याबाबतचा निर्णय प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे विभाग लवकरच घेईल. सध्या तरी एक ‘डेमो’ पॅसेंजर वगळता ९ एक्सप्रेस रेल्वे सुरु आहेत. डेमो रेल्वे सर्व थांब्यावर थांबत आहे.
कोरोना महामारी संपलेली नाही. त्यामुळे प्रवासी संख्या अजून तरी वाढलेली नाही. कोरोनाच्या नियमाबाबत प्रवाशांना वेळोवेळी सूचना दिली जात आहे. थांब्याबाबतचा निर्णय रेल्वे विभागाच्या अखत्यारित आहे.
-अलोक नारायण, रेल्वे स्टेशन मास्टर, हिंगोली
थांबा नसल्याने आम्हाला होतो त्रास...
एक्सप्रेस रेल्वे तर छोट्या थांब्यावर कधीच थांबत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीचा सहारा घेत शहराच्या ठिकाणी जावे लागते. डेमो रेल्वेही मोजक्याच ठिकाणी थांबत आहे. रेल्वे विभागाने थांब्याबाबत निर्णय घ्यावा, असे प्रवाशांनी सांगितले.
प्रवाशांनी मागणी केल्यामुळे रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरु केली आहे. परंतु, मोजक्याच ठिकाणी ‘डेमो’ थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. याबाबत स्टेशन मास्टरला काही प्रवाशांनी सांगितले. परंतु, महिना झाला अजून त्याचा काही विचार केला नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.