नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:29 AM2018-10-01T00:29:31+5:302018-10-01T00:29:53+5:30
येथील नुरीबाबा यांच्या उरुसाला २ आॅक्टोबर पासून सुरूवात होत आहे. उरुसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ आॅक्टोबर रोजी येथील रजा मैदान येथून संदल मिरवणूक निघणार आहे. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने निघणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील नुरीबाबा यांच्या उरुसाला २ आॅक्टोबर पासून सुरूवात होत आहे. उरुसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२ आॅक्टोबर रोजी येथील रजा मैदान येथून संदल मिरवणूक निघणार आहे. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने निघणार आहे. संदल दर्गाहवर पोहोचल्यानंतर फातेहाखानी होणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी नुरी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ६ आॅक्टोबर दरम्यान कव्वाली आॅल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले. मुशायºयात नामवंत कवीची उपस्थिती राहील. उरुसानिमित्त शहर कमानी, पताके, हिरवे झेंडे आदींनी सजविल्या जाते. उरुसादरम्यान विविध प्रकारची दुकाने, आगाश पाळणे आदींची रेलचेल असते. हिंदू- मुस्लीम धर्मियांचे हजारो भाविक नुरीबाबा यांच्या दर्शनासाठी येतात. आठ दिवस शहरात रेलचेल असते. प्रत्येकांच्या घरी पाहुणे मंडळींनी घरे गजबजतात. उरुसानिमित्त दर्गाह मैदानावर मोठी यात्रा भरते. क्रिकेट व व्हॉलिबॉल स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. शहरात येणाºया हजारो भाविकांसाठी लंगरची व्यवस्था केली जाते. हिंदू- मुस्लीमांचे श्रद्धास्थान असलेल्या नुरीबाबा यांच्या दर्ग्यात दर्शनासाठी भारतभरातून भाविक येतात. उरुस कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन नायब मुतवल्ली खाजा जहागीरदार यांनी केले आहे.