पोषण आहार जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:03 AM2018-09-26T01:03:18+5:302018-09-26T01:03:38+5:30

शहरातून २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

 Nutrition Diet Public awareness rally | पोषण आहार जनजागृती रॅली

पोषण आहार जनजागृती रॅली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातून २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने २५ सप्टेंबर मंगळवार रोजी राष्ट्रीय पोषण आहार अभियानानिमित्त हिंगोली शहरातील गांधीचौकातून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. रॅलीला आ. रामराव वडकुते यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी नागरी प्रकल्प अधिकारी डॉ.मोहन कौसडीकर, मुनीर पटेल, जि. प. सदस्य संजय दराडे, शांताबाई मोरे ,मुख्य सेविका रेखा पडोळे, सुमन बेरजे आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पोषण आहाराबाबत जनजागृतीपर माहिती दिली. तसेच बेटी बचाव बेटी पढाव यासंदर्भात हातात फलक व बॅनर घेऊन घोषणा देत रॅली मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. रॅलीत लहान बालकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. रॅलीत उषा वाठोरे, संगिता कोरडे, महानंदा पुडंगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी लता करंडकर, संगीता घाटोळ, संगीता देशमुख, पंचफुला रसाळ, शशीकला खडसे, संतोषी थोरात, अंजुमबी, संगीता वाकळे, नंदा दिपके, कल्पना खंदारे, रेश्मा शेख, शोभा पातोडे, संगीता लोखंडे, जोत्सना वाकळे, जयश्री खिल्लारे यांच्यासह सर्व अंगवाडी सेवीका व मदतनीसांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Nutrition Diet Public awareness rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.