उन्हाळी सुट्यांतही पोषण आहार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:57 PM2019-05-07T23:57:30+5:302019-05-07T23:57:48+5:30
जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये उन्हाळी सुट्यांतही शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक व माध्यमिक तसेच अनुदानित विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक, सैनिकी शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु यंदा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याने टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविला जाणार आहे. सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असून संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना तसेच पत्रही पाठविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात येणाºया सर्व शाळेत पोषण आहार वाटप करण्यात यावा, तसेच एकही बालक पोषक आहारपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी गट शिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. शाळा सुरू होईर्यंत म्हणजेच १७ जून २०१९ पर्यंत शालेय पोषण आहार शिजविण्यात येणार आहे. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, असेही कळविण्यात आले आहे. एकंदरीत सध्या तरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थी पोषण आहार योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सुट्यांमध्ये नातेवाईकांच्या गावी जातात. किंवा कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.