राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:06 AM2018-12-17T00:06:39+5:302018-12-17T00:07:15+5:30
मागील सात दिवसांपासून हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या स्व. बलभद्रजी कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी ओडिशाचा राऊरकेला सेल संघ विरूध्द अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील सात दिवसांपासून हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या स्व. बलभद्रजी कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी ओडिशाचा राऊरकेला सेल संघ विरूध्द अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यात झाला. दोन्ही संघांनी चुरशीचा सामना खेळला मात्र राऊरकेला सेल संघाने नाशिकच्या संघाला २-१ ने पराभूत करीत हॉकी स्पधेर्चे विजेतेपद पटकाविले. उपविजेता संघाचा मान नाशिकच्या संघाला मिळाला आहे.
रविवारी उपांत्य फेरीचे सामने झाले. पहिला सामना अर्टीलरी सेंटर नाशिक विरूध्द आरडीटी अनंतापूर यांच्यामध्ये झाला. या सामान्यात नाशिक संघाने अनंतापूरचा २-१ ने पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्याचा सामनावीर म्हणून अनंतापूर संघाचा पी.थरून ठरला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ए.ओ.सी.सिकंदराबाद विरूद्ध सेल राऊरकेला यांच्यात लढत झाली. या सामन्यात राऊरकेला संघाने ए.ओ.सी.सिकंदराबादला ३-१ ने पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तिसरा सामना तृतीय पारितोषिकासाठी आर.डी.टी. अनंतपूर आणि ए.ओ.सी. सिकंदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात सिकंदराबाद संघाने अनंतापूर संघाचा २-० ने पराभव केला. या सामन्याचा सामनावीर व्यंकटेश यास ज्येष्ठ तुकाराम झाडे यांच्या हस्ते पारितोषिक दिले. अंतिम सामना राऊरकेला सेल विरूद्ध अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यामध्ये अटीतटीचा झाला. या सामन्यात राऊरकेलाच्या संघाने नाशिकच्या संघावर अनेकवेळा जोरदार चढाई केली. प्रत्युत्तरात नाशिकच्या संघानेही राऊरकेला संघावर आक्रमण केले. या सामन्यामध्ये दोन्ही संघात चांगलीच चुरस पहायला मिळाली. परंतु, राऊरकेला सेलच्या संघाने नाशिकच्या संघाला २-१ ने पराभूत करीत राष्ट्रीय हॉकी स्पधेर्चे विजेतेपद पटकाविले.
हिंगोली शहरात हॉकी स्पर्धा दसरा महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. परंतू दसरा महोत्सव शासनाच्या ताब्यात गेल्यापासुन हा खेळ दुरापास्त झाला. काही वषार्पुर्वी स्व.बाबूलाल राठोड यांच्या नावाने अनेकवर्ष या स्पर्धा घेण्यात आल्या. शहरवासीयांच्या आवडीचा हा खेळ असल्याने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हॉकीचे सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. अनेक वषार्नंतर यावर्षी प्रथमच कयाल, राठोडसह इतर मान्यवरांच्या पुढाकाराने हॉकीचे सामने सुरू झाले. मंगळवारी झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर तोबा गर्दी जमली होती. अंतिम सामन्यानंतर हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र कयाल, सुभाष तापडिया, कमलकिशोर काबरा, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, राठोड यांच्या हस्ते विजेता संघ राऊरकेला प्रथम पारितोषिक ३१ हजार रूपये व ट्रॉफी तर उपविजेता नाशिक संघाला २१ हजार आणि ट्रॉफी प्रदान केली. तृतीय आलेला सिकंदराबाद संघाला १ हजार व स्मृतिचिन्ह प्रदान केले. यशस्वीतेसाठी अॅम्येच्युअर जिल्हा हॉकी असोसिएशन, एमबीआर गु्रपच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.