व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 12:06 PM2023-04-17T12:06:56+5:302023-04-17T12:08:30+5:30

पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करणे आणि कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Offensive text about police on WhatsApp; A case has been registered against one | व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल

व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल

googlenewsNext

औंढा नागनाथ : व्हॉट्सॲप ग्रुपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर शेअर करणे, तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने रविवारी रात्री तालुक्यातील येळेगाव सोळंके येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी विलास घोंगडे असे आरोपीचे नाव आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके येथील रवी विलास घोंगडे याने आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांबद्दल व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह चॅटिंग केली. पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करणे आणि कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खर्डे करीत आहेत

Web Title: Offensive text about police on WhatsApp; A case has been registered against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.