गटशिक्षणाधिकारी कार्यालय ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:14 AM2018-06-24T01:14:52+5:302018-06-24T01:15:08+5:30
येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एकही अधिकारी-कर्मचारी अधिकृतपणे कार्यरत नसल्याने कार्यालय ओस पडले असून तालुका शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: कोलमडला आहे. या प्रकाराकडे जिल्हा शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात एकही अधिकारी-कर्मचारी अधिकृतपणे कार्यरत नसल्याने कार्यालय ओस पडले असून तालुका शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: कोलमडला आहे. या प्रकाराकडे जिल्हा शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.
येथील पंचायत समिती कार्यालयातील तालुकास्तरीय शिक्षण विभागाचे कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने पद स्थापनाच मंजूर केली नाही. मागील २0 वर्षांपासून शिक्षण विभागाचा कारभार कारकुनी कर्मचाऱ्यांविना चालू आहे. शिक्षण विभागातत एक गटशिक्षणाधिकारी व दोन विस्तार अधिकाºयांची पदे मंजूर आहेत. पंरतु वर्षभरापासून गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. एक विस्तार अधिकाºयांचे पद रिक्त असून कार्यरत विस्तार अधिकाºयांकडेच गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार दिला होतो. त्यातच तालुक्याीतल कापडसिंगी येथील प्रकरण घडले अन् प्रभारी अधिकाºयावरही गुन्हा दाखल झाला. या परिस्थितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी सीताराम जगताप हे रजेवर गेले. त्यामुळे या कार्यालयात एकही अधिकृत अधिकारी, कर्मचारी उरला नाही. तालुक्यात कार्यरत साधनव्यक्ती, अपंग शिक्षक यांच्या वतीने किरकोळ कामकाजाचा निपटारा केला जात असल्याने महत्त्वाचे कार्यलयीन कामकाज मात्र ठप्प पडले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच शिक्षण विभागाच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत. शिक्षण विभागाच्या कार्यालयात कायम कुणीही दिसत नसून खुर्च्या, टेबल अधिकारी-कर्मचाºयांचा प्रतीक्षेत रिकामे आहेत. या सर्वांचा परिणाम तालुक्यातील शाळांच्या विकासावर होत आहे. तालुका स्तरावरून ग्रामीण भागातील शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी कार्यरत नाही.
शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाचा विषयासंबंधी प्रशासनाचा बेफिकीर वृत्तीने तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी, नवीन पदे मंजुरीसाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र पंचायत समिती
सर्व विकास कामांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा असताना तेथे सुधारणा घडवू न शकलेल्या लोकप्रतिनिधींना शिक्षण विभागाचा पुळका येणे शक्यच नाही. केवळ मिरविण्यापुरतीच पुढारी मंडळी उरली असल्याने तालुक्यातील समस्यांमध्ये भर पडत आहे.
आपोआप होणाºया कामाचे श्रेय घेण्यासाठी शंभर डोकी तयार असतात. मात्र खºया प्रश्नांमध्ये लक्ष न दिल्याने अक्षरश: बोगस शाळा चालविणारे उखळ पांढरे करून घेत आहेत. त्यातून संबंधितांची दुकानदारी होत असली तरीही पिढ्यान् पिढ्या बरबाद होत आहेत, हे पुढाºयांनी लक्षात घेतले पाहिजे.