नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:56 PM2018-03-04T23:56:13+5:302018-03-04T23:56:19+5:30
मागील दहा वर्षांपासून किरायाच्या इमारतीत पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू होता. अखेर नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला टोलेजंग इमारतीत कार्यालय ३ मार्च रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दहा वर्षांपासून किरायाच्या इमारतीत पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू होता. अखेर नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला टोलेजंग इमारतीत कार्यालय ३ मार्च रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
हिंगोली शहरातील आजम कॉलनी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय खासगी इमारतीत सुरू होते. अपुºया जागेत कोंदट वातारणात अधिकारी व कर्मचाºयांना कर्तव्य बजवावे लागे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला एसीबीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. बांधकाम पूर्ण झाले असून हिंगोली-कळमनुरी मुख्य मार्गावर नवीन सुसज्ज सुविधांयुक्त कार्यालय उभारण्यात आले आहे. ३ मार्च रोजी नवीन इमारतीत एसीबीचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे आता एसीबीच्या अधिकाºयांना संपर्क करणे, तसेच लाचेची मागणी करणाºयांविरूद्ध तक्रार देण्यास अधिक मदत होणार आहे. शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहितीही नागरिकांना मिळण्यास सोपस्कार झाले आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर यांनी केले.
कार्यालयात स्वतंत्र कक्ष
लाचलुचपत प्रतिबंधक नवीन कार्यालयात विविध स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वतंत्र संगणक कक्ष तसेच गोपनीय शाखा यासह विविध विभागाचे आता स्वतंत्र कक्ष आहेत. त्यामुळे पुर्वीपेक्षा कामांना गती येण्यास मदत होणार आहे.