हिगोलीत गटविकास अधिका-यांच्या मारहाणीच्या निषेधार्त अधिका-यांनी केले लेखणीबंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 05:10 PM2017-12-08T17:10:37+5:302017-12-08T17:12:19+5:30
गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
हिंगोली : गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
गुरुवारी ( दि. ७ ) पंचायत समिती सदस्या मुक्ता गोरे यांचे पती संतोष गोरे यांनी गटविकास अधिकारी ए.एल.बोंद्रे यांना त्यांच्या दालनात येवून मारहाण केली होती. त्यांना कोणतेच अधिकार नसताना रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्याचा विषय घेवून त्यांनी हे कृत्य केले. या घटनेचा निषेध व्यक्त करत आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले.
यानंतर सर्व अधिका-यांनी जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना या बाबत निवेदन दिले. घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एन. घुले, ए.आर.डुब्बल, एन.एस.दाताळ, डॉ.राहुल गिते, डॉ.ए.बी.लोणे, जी.डी. गुठ्ठे, मनोहर खिल्वारी, जे.एम.साहू, सुधीर ठोंबरे, जी.पी.डुकरे, एस.आर. बेले, एस.व्ही. गोरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत. याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य शाखेनेही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यावर विनोद देसाई, समीर भाटकर, ग.दि.कुलथे आदींच्या सह्या आहेत.