स्वस्त धान्यावरून एकास पोलीस ठाण्याच्या आवारातच बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:32 AM2021-07-30T04:32:06+5:302021-07-30T04:32:06+5:30
यासंदर्भात फळ व्यापारी मोहम्मद खलील मोहम्मद खाजा (रा. तलाबकट्टा) यांनी तक्रार दिली आहे. २९ जुलै रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास ...
यासंदर्भात फळ व्यापारी मोहम्मद खलील मोहम्मद खाजा (रा. तलाबकट्टा) यांनी तक्रार दिली आहे. २९ जुलै रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास मसानी पेठ येथील स्वस्त धान्य दुकानासमोर मोहम्मद खलील व त्यांच्या मुलास स्वस्त धान्याच्या किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ करून थापडबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ११ ते १२ जणांनी आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देता का म्हणून पोलीस ठाण्याच्या आवारात मोहम्मद खलील यांच्या भावास थापडबुक्क्याने मारहाण करून धक्काबुकी केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मोहम्मद खलील मोहम्मद खाजा यांच्या फिर्यादीवरून शंकर नारायणराव सांगळे, विनोद गंगाधरराव बांगर, अनिल गंगाधरराव बांगर, सागर उर्फ आकाश कुंडलिकराव नागरे, सोनु सुभाष बांगर व इतर सहा ते सात जणांविरूद्ध (सर्व रा. मंगळवारा) हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि आर.एस. शहारे करीत आहेत.