अपंग, मागासवर्गीयांचा एक कोटीचा अनुशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:50 PM2018-06-15T23:50:30+5:302018-06-15T23:50:30+5:30
ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती आहेत. यात २0 टक्के निधी मागासवर्गीयांना सार्वजनिक किंवा वैयक्तिक लाभासाठी देण्याची तरतूद आहे. यासाठी वित्त आयोगाचे तर यापूर्वीच आराखडे तयार केलेले आहेत. त्यातील कामे यातून करायची आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतींना १.३0 कोटी रुपयांची तरतूद मागच्या आर्थिक वर्षात करणे क्रमप्राप्त होते. यात हिंगोली १९.५ लाख, कळमनुरी -७५.६३ लाख, वसमत-११.६१ लाख, औंढा ना-४.६४ लाख तर सेनगाव १९.३५ लाख अशी तरतूद होती. एवढा खर्चही होणे अपेक्षित होते. मात्र मार्च २0१८ अखेरच्या खर्चाच्या तपशिलानुसार ९१.७७ लाखांचा अनुशेष आहे. तालुकानिहाय हिंगोली- १४.२0 लाख, कळमनुरी-७३.१८ लाख, वसमत-१.२७ लाख, औंढा ४१ हजार, सेनगाव-२.६९ लाख अशी स्थिती आहे. केवळ ३८.९७ लाखांचाच खर्च मागच्या आर्थिक वर्षात झाला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत ग्रामपंचायतींची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, पुन्हा अनुशेष वाढण्याची भीती आहे.
कळमनुरीत मागासवर्गीयांसाठी तरतूद खर्च न झाल्याचा आकडा सर्वाधिक आहे. या तालुक्यात मागासवर्गीयांची संख्याही मोठी आहे. तरीही यात शिल्लक असलेल्या अनुशेषाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
या योजनेत काम करणाºया ग्रामपंचायतींनी खरेच ही कामे केली की कसे? याबाबतही शंकाच दिसून येत आहे.
अपंगांसाठी ३ टक्के खर्चाच्या तरतुदीत हिंगोली ३.९0 लाख, कळमनुरी १४.१0 लाख, वसमत-२.९४ लाख, औंढा २.७९ लाख, सेनगाव ३.८७ लाख अशी २७.६१ लाखांची तरतूद होती. मात्र त्यापैकी अवघा १२.२८ लाखांचा खर्च झाला आहे. तर १५.३३ लाखांचा अनुशेष शिल्लक आहे. यात हिंगोली ८0 हजार,
कळमनुरी १३.५९ लाख, वसमत-२९ हजार, औंढा २५हजार, सेनगाव ४0 हजार असे चित्र आहे. येथेही कळमनुरी तालुक्याची उदासीनताच असल्याचे दिसून येत आहे. यातही अपंगांना त्या तुलनेत काहीच सुविधा मिळत नसल्याचे सांगितले जाते.
अनेक ग्रामपंचायतींकडून तर विविध योजनांत मागासवर्गीयांना निधी मिळतो, असे कारण सांगून कागदी कारभार करण्याचा प्रयत्न होतो. तरीही अनुशेष मात्र कायमच आहे.