ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्ससाठी एक कोटीचा निधी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:38 AM2021-04-30T04:38:04+5:302021-04-30T04:38:04+5:30
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्ससाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार ...
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्ससाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत असून ऑक्सिजनसाठी आरोग्य विभागासह नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यातील गंभीर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स पुरविण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत १ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. एक कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.