कर सल्लागार संघटनेचे एक दिवसीय आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:52 AM2021-02-05T07:52:13+5:302021-02-05T07:52:13+5:30
जिल्ह्यातील सर्व कर सल्लागार, सीए,वकील या एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. काळया फिती लावून कायद्यातील जाचक अटी ...
जिल्ह्यातील सर्व कर सल्लागार, सीए,वकील या एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. काळया फिती लावून कायद्यातील जाचक अटी दूर कराव्यात या करीता स्टेट जीएसटी, केंद्र जीएसटी येथील अधिकाऱ्यांना निवेदन देवून कायद्यातील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सकाळी अकरा वाजता भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून राष्ट्रगीतानंतर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तसेच अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष संदीप पतंगे यांनी आंदोलनाची रुपरेषा समजावून सांगितली. राज्य कर अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगोली जिलहा कर सल्लागार संघटनेने घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन करीत हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाने आपला पाठिंबा जाहीर करीत समर्थनाचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी संदीप पतंगे, सीए महेश बियाणी, ॲड. डुब्बेवार, ॲड. तापडीया, राजेश सोमाणी, ॲड. दिलीप झंवर, सुनील झंवर, केशव पतंगे, ॲड.पंकज जोशी, सीए पोपळघट, सुमीत महाजन, वैभव रोडे, कपील बगडीया, कोंडेवार, ॲड. सागर सारडा आदी उपस्थित होते.
आंदोलनाला खासदार राजीव सातव यांचा पाठिंबा
हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी कायद्याचे जाचक नियम व त्रासदायक परिपत्रके थांबवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीकरीता एक दिवसीय धरणे देशव्यापी अंदोलनाला खा. ॲड. राजीव सातव यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना पत्र देवून पाठींबा दिला. खा. राजीव सातव यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी सुधीरअप्पा सराफ, कॉंग्रेसचे प्रवक्ते विलास गोरे, मिलींद उबाळे, नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी, सुमीत चौधरी व हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधीकारी आदी उपस्थित होते.
२९ एचएनएलपी५