एका डॉक्टरची सेवा शासनास परत, दुसऱ्याच्या सेवामुक्तीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:49+5:302021-03-13T04:54:49+5:30
शिरड शहापूर येथे आरोग्य विभागाने कॉर्पोरेटच्या धर्तीवर टोलेजंग इमारत उभी केली आहे. या नव्या इमारतीत रुग्णांना चांगली सेवा मिळेल, ...
शिरड शहापूर येथे आरोग्य विभागाने कॉर्पोरेटच्या धर्तीवर टोलेजंग इमारत उभी केली आहे. या नव्या इमारतीत रुग्णांना चांगली सेवा मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र या ठिकाणी ना प्रसूती होत होती ना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया. नियमित ओपीडीचेही अनेकदा वांदे होते. त्यामुळे डॉ. चंद्रकांत कोल्हे यांची सेवा शासनास परत करण्याचा प्रस्ताव उपसंचालकांकडे, तर कंत्राटी डॉ. शीला बोथीकर यांना सेवामुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सध्या शिरड शहापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शशिकांत सावळे यांना देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने एका वैद्यकीय अधिकऱ्यास असा दणका दिल्याने इतरांनी यातून बोध घेणे अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्ण संदर्भित करावे लागतात. मात्र तक्रार झाली तरच कारवाई होते. याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.