हिंगोली-कनेरगाव मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:45 IST2018-12-13T17:44:50+5:302018-12-13T17:45:56+5:30
आज सकाळी ९ वाजेदरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला.

हिंगोली-कनेरगाव मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
हिंगोली : तालुक्यातील हिंगोली कनेरगाव राज्य रस्त्यावरील फाळेगाव पाटीजवळ आज सकाळी ९ वाजेदरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला. यात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.
हिंगोली - कनेरगाव राज्य रस्त्यावर दुचाकी क्र. आरजे १४ एम ५९६० व दुसरी दुचाकी क्रमांक एमएच ३८ एल २४०० वर तिघेजण हिंगोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, दोन्ही दुचाकींना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. यावेळी दत्तात्रय पुंडलीकराव लोहगावे (५५, रा. नर्सी नायगाव जि. नांदेड ) यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुरलीधर नारायण सैनी ( रा. राजस्थान हल्ली मुक्काम नर्सी नायगाव जि. नांदेड ) व कयुम खा. सलमा खा. पठाण (२६, रा. कनेरगाव नाका ता. हिंगोली ) हे गंभीर जखमी झाले. जखमीवर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.