एक लाख गरिबांना मिळणार स्वप्नामधील हक्काचं घर
By यशवंत भीमराव परांडकर | Published: June 7, 2023 09:43 AM2023-06-07T09:43:47+5:302023-06-07T09:44:32+5:30
‘शबरी आदिवासी’ योजनेंतर्गत राज्याने निश्चित केले १,०७,०९९ घरांचे उद्दिष्ट
यशवंत परांडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : आदिवासी उपाययोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय २ जून २०२३ रोजी शासनाने घेतला आहे. यासंदर्भात लवकर अंमलबजावणी करण्याची सूचनाही राज्य शासनाने केली आहे.
पात्र लाभार्थ्यांना घरकुल
उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण १ लाख ७ हजार ९९ उद्दिष्ट/लक्ष्यांक निश्चित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
घरासाठी या आहेत अटी...
- ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १.२० लक्ष आहे, अशा लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
-२८ मार्च २०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमाबरोबर आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
- या योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून, दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
राज्यात असे दिले घरांचे उद्दिष्ट...
नाशिक : कळवण ३०००
नाशिक ५०००
जळगाव : यावल ५०००
नंदुरबार : तळोदा १२०००
धुळे ५७०९
अहमदनगर : राजूर २०००
ठाणे : शहापूर २०००
पालघर : डहाणू १२७५
जव्हार २९४७
रायगड २६३९
रत्नागिरी ०२
पुणे १८६४
कोल्हापूर : घोडेगाव १०
सातारा १०
सोलापूर १००
नांदेड : किनवट ३०००
हिंगोली : कळमनुरी ५०००
परभणी १०००
छत्रपती संभाजीनगर ३९३६
धाराशिव १२५
जालना १७९४
लातूर ६३६
बीड ११७९
अमरावती : धारणी ७९०६
अकोला ६००
बुलढाणा १५००
वाशिम ७००
यवतमाळ : पांढरकवडा ४०००
पुसद ५००
नागपूर ५०००
वर्धा ५००
गोंदिया : देवरी १५००
भंडारा १२२६
चंद्रपूर : चंद्रपूर ७५००
चिमूर ११६६
गडचिरोली : गडचिरोली २०००
अहेरी ४५०
भामरागड ३२५