लहान मुलांना शिव्या दिल्यावरून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:37+5:302021-09-25T04:31:37+5:30

हिंगोली : आमच्या मुलांना शिव्या का दिल्या या कारणावरून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ४० हजार रुपये ...

One of them was stabbed in the head for cursing children | लहान मुलांना शिव्या दिल्यावरून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली

लहान मुलांना शिव्या दिल्यावरून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली

Next

हिंगोली : आमच्या मुलांना शिव्या का दिल्या या कारणावरून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत काढून घेतली. ही घटना हिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी उशिरा २३ सप्टेंबर रोजी बासंबा पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी किशन महादू चौधरी (रा. उमरखोजा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले की, लहान मुलांना शिव्या का दिल्या या कारणावरून गावातील सात जण घरासमोर आले. त्यातील समाधान किशन चौधरी याने डोक्यात कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केले. तसेच विश्वनाथ हरिभाऊ चौधरी याने हातातील लोखंडी गजाने बरगडीवर, हाताच्या दंडावर मारून जखमी केले. तर शंकर बालाजी चौधरी याने काठीने मारहाण केली. शिवाय मुलाच्या हातापायावर मारहाण केली. तसेच गणेश ऊर्फ सोनू किशन चौधरी, सुधाकर कांताराव चौधरी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दीपक गंगाराम चौधरी व बालाजी विठ्ठल चौधरी यांनी घरात घुसून पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्नीच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची आठ ग्रॅमची सोन्याची पोत जबरदस्तीने काढून घेतली. तसेच सातही जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी किशन महादू चौधरी यांच्या फिर्यादीवरून दीपक गंगाराम चौधरी, बालाजी विठ्ठल चौधरी, विश्वनाथ हरिभाऊ चौधरी, समाधान किशन चौधरी, शंकर बालाजी चौधरी, गणेश ऊर्फ सोनू किशन चौधरी, सुधाकर कांताराव चौधरी याचेविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

Web Title: One of them was stabbed in the head for cursing children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.