शेतकऱ्यांसाठी ‘एक वेळ समझोता योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:21 AM2018-10-01T00:21:24+5:302018-10-01T00:21:49+5:30
राज्यातील सततची नापीकी व दुष्काळामुळे कर्जबाजारी शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील सततची नापीकी व दुष्काळामुळे कर्जबाजारी शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत पात्र शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजना राबविण्यात येणार आहे.
योजने अंतर्गत मुद्दल व व्याजासह १.५ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजने अंतर्गत पात्र शेतकºयांनी त्यांच्या हिश्याची सूंपर्ण रक्कम ३० आॅक्टोबर २०१८ पर्यंत बँकेत जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली.
शेतकºयांनी ही रक्कम ३० सप्टेंबर पर्यंत भरण्यास सांगण्यात आले होते. ही तारीख आत संपुष्टात आल्याने आता सदर रक्कम भरण्याच्या तारखेत बदल करण्यात आला असून १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर पर्यंत शेतकºयांना आता रक्कम भरता येणार आहे.