औंढा येथे दुचाकी-टेंपो अपघातात एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:41 PM2018-09-19T17:41:17+5:302018-09-19T17:47:51+5:30
दुपारी १ वाजता दुचाकी व टेंपोची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
औंढा नागनाथ (हिंगोली ) : येथील पिपळदरी फाट्यावर दुपारी १ वाजता दुचाकी व टेंपोची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
संग्राम सोपान कऱ्हाळे (३३) असे मृताचे नाव आहे. ते हिंगोली तालुक्यातील दिग्रस कर्हाळे येथील रहिवासी आहेत. आज दुपारी ते नांदेडकडे दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान एक टेंपो औंढायेथून हिंगोलीच्या दिशेने निघाला होता. पिंपळदरी फाट्याजवळ आले असता दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात संग्राम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, पीएसआय राहुल तायडे, जमादार अफसर पठाण, भीमराव चिंतारे, अजय पंडित, सुखदेव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.