‘आरटीई’ प्रवेशासाठी आॅनलाईन सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:50 PM2018-03-10T23:50:44+5:302018-03-10T23:50:48+5:30

मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आॅनलाईन अर्ज सादर करण्याची ११ मार्च आज शेवटची तारीख आहे. तसेच १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी हिंगोली येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.

 Online registration for 'RTE' entry | ‘आरटीई’ प्रवेशासाठी आॅनलाईन सोडत

‘आरटीई’ प्रवेशासाठी आॅनलाईन सोडत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आॅनलाईन अर्ज सादर करण्याची ११ मार्च आज शेवटची तारीख आहे. तसेच १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी हिंगोली येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
२0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पालक व लोक प्रतिनिधींच्या मागणीनुसार आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली. ११ मार्च आॅनलाईन अर्ज सादरची शेवटचा दिवस आहे. जास्तीत जास्त पालकांनी प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले आहे. तर १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांनी प्रत्येक्ष शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. यावेळी जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, प्रशांत भगत यांनी केले. आतापर्यंत आरक्षित ६९२ जागेसाठी ११२० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

Web Title:  Online registration for 'RTE' entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.