केवळ चार टक्के शेतक-यांना कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:52 PM2017-12-01T23:52:54+5:302017-12-01T23:52:58+5:30
कर्जमाफीच्या अर्जांची छाननी अतिशय कासवगतीने चालत असल्याने १ लाख ९३४५ पैकी केवळ ५७00 शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे. २३ कोटींची ही कर्जमाफी आहे. एरवी अधिकारी याची माहिती द्यायला तयार नसून पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्जमाफीच्या अर्जांची छाननी अतिशय कासवगतीने चालत असल्याने १ लाख ९३४५ पैकी केवळ ५७00 शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे. २३ कोटींची ही कर्जमाफी आहे. एरवी अधिकारी याची माहिती द्यायला तयार नसून पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांना कर्जमाफीची माहिती दिली. ते म्हणाले, कर्जमाफीच्या अर्जांवर अजून काम सुरू आहे. अर्जांमध्ये त्रुटी असल्याने अडचणी आल्या होत्या. आता अर्जांची छाननी होत आहे. १ लाख ९ हजार ३४५ अर्ज आले होते. यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४५४२ खातेदारांना २६.४0 कोटींची कर्जमाफी झाली. तर प्रत्यक्ष ३२५0 जणांच्या खात्यावर १९.९८ कोटी रुपये जमा झाले. राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार असलेल्या ३८00 जणांना २३.0७ कोटी मंजूर झाले. यापैकी ५३३ जणांच्या खात्यावर ३.0९ कोटी रुपये जमा झाले. जि.म.स. बँकेच्या २४६४ जणांना ४.२४ कोटींची कर्जमाफी झाली. यात १९१५ जणांच्या खात्यावर ३.७१ कोटी जमा केले आहेत. अजूनही प्रक्रिया सुरू आहे, असे कांबळे यांनी सांगितले.