...तरच मिळणार दिव्यांगांना योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:26 AM2018-01-31T00:26:49+5:302018-01-31T00:27:03+5:30

पहिली ते बारावीमाधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याच्या सूचना शासनाकडून आहेत. यूडायसनुसार जिल्ह्यात ४ हजार ७४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या आहे. सर्वच विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरावी लागणार आहे, ज्यांची माहिती भरली गेली त्याच विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

 ... Only then will the benefits of Divya Yojana be made | ...तरच मिळणार दिव्यांगांना योजनांचा लाभ

...तरच मिळणार दिव्यांगांना योजनांचा लाभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पहिली ते बारावीमाधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याच्या सूचना शासनाकडून आहेत. यूडायसनुसार जिल्ह्यात ४ हजार ७४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या आहे. सर्वच विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरावी लागणार आहे, ज्यांची माहिती भरली गेली त्याच विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
शासनाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. परंतु आता या विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरावी लागणार आहे. संबधित यंत्रणेद्वारे तालुकास्तरावर माहिती भरून घेण्याचे काम सुरू आहे. २ फेबु्रवारीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांची माहिती भरून घेण्यासाठी शिक्षण विभागाने संबधित यंत्रणेस डेडलाईन दिली आहे. हिंगोली तालुक्यासाठी तालुका समन्वयक अजय माद्रप, औंढा येथे हनुमान काळबांडे, कळमनुर येथे शिवाजी टोंम्पे, वसमत येथे परमेश्वर गुडमे, सेनगाव विनायक नप्ते यांच्यासह कर्मचाºयांवर ही जबाबदार देण्यात आली आहे. त्यामुळे संबधित तालुक्यातील शाळांनी तसेच पालकांनी समन्वयकांशी संपर्क करून दिव्यांग मुलांची माहिती भरून घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, सर्व शिक्षा अभियानचे सुदाम गायकवाड यांनी केले आहे. शासनाकडून दिव्यांगांना साहित्य साधने, अपंगत्वाची शस्त्रक्रिया, विविध प्रकारचे भत्ते, थेरपी सेवा यासह विविध योजनांचा लाभ दिला जातो.
१५८२ विद्यार्थ्यांची माहिती भरली नाही...
सर्व शिक्षा अभियानकडून सध्या दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची मोहीम जोरात सुरू आहे. आॅनलाईन माहिती भरली गेली नाही, असे जिल्ह्यात एकूण १५८२ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची सध्या प्रक्रिया सुरू असून संबधित यंत्रणेकडे काम पूर्ण करून घेण्यास केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. सदर दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन ६६६.ेस्र२स्र.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू आहे. संबधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच पालकांनी माहिती भरून घेण्यासाठी यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title:  ... Only then will the benefits of Divya Yojana be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.