'मंदिर खुले करा'; हिंगोलीत विश्व हिंदू परिषदेचे 'ढोल बजाओ' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 02:15 PM2020-10-24T14:15:17+5:302020-10-24T14:16:41+5:30
भक्तांच्या भावनांशी सरकारने खेळू नये अशा संतप्त भावना विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
हिंगोली : मंदिर खुले करावीत या मागणीसाठी हिंगोलीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २४ ऑक्टोबर रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोर आंदोलन करून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले.
यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम ! जय श्रीराम ! अशा घोषणा देत लवकरात लवकर मंदिर खुली करावीत, भक्तांच्या भावनांशी सरकारने खेळू नये अशा संतप्त भावना विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. सरकारने दारूची दुकाने खुली केली, परंतु मंदिर उघडली जात नाहीत. त्यामुळे सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करावा व मंदिरे खुली करावीत अशी मागणी करण्यात आली. ढाेल बजाओ आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुरलीधर तोष्णीवाल, उपाध्यक्ष सांवरमल अग्रवाल, राजेंद्र हलवाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.