नवीन चेहऱ्यांना संधी की, जुन्यांना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:07+5:302021-01-14T04:25:07+5:30
येथे २ हजार ३४७ मतदार आहेत. १५ जानेवारी रोजी येथील मतदान हाेणार आहे. यावर्षी खुडज ग्रा.पं. निवडणुकीत अनेक तरुण ...
येथे २ हजार ३४७ मतदार आहेत. १५ जानेवारी रोजी येथील मतदान हाेणार आहे. यावर्षी खुडज ग्रा.पं. निवडणुकीत अनेक तरुण व महिला निवडणूक रिंगणात आहेत. चारही वाॅर्डांत चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने जुन्यांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागत आहे. वॉर्ड १ ते ४ मध्ये एकूण ८ उमेदवार जुने आहेत. उर्वरित नवीन चेहऱ्यांना निवडणुकीत संधी मिळाली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सिगेला पोहोचली असून ज्या त्या पॅनलचे उमेदवार जोर लावत आहेत. उमेदवारांकडून घरोघरी भेटी देत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पाेहोत आहेत. तर अनेकजण मनधरणी करत आहेत. उमेदवार राजकीय समीकरण जुळवत आहेत. सकाळ, संध्याकाळ मतदारांच्या घरी भेटीगाठी घेत आहेत. वाॅर्ड क्रं. १ ते ३ मध्ये चुरशीची लढत हाेणार आहे; परंतु नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने जुन्या उमेदवारांसमाेर आव्हान उभे आहे.