नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:57 PM2021-05-24T19:57:02+5:302021-05-24T19:57:40+5:30

गिरगाव येथील फिर्यादी अंगणवाडी मदतनीस हिला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष आरोपीने दाखवून चार वर्षांपासून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला.

Oppression by showing job lure; Filed charges against two brothers | नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे अंगणवाडी मदतनीसला अंगणवाडी सेविका या पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून चार वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अंगावरून काढून घेतल्याची तक्रार कुरुंदा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गिरगाव येथील फिर्यादी अंगणवाडी मदतनीस हिला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष आरोपीने दाखवून चार वर्षांपासून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने २१ मे रोजी रात्री १२.३० वाजता पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली व निघून गेला. तेव्हा फिर्यादी महिला ही आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता, यातील मुख्य आरोपीच्या भावाने तिला जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

फिर्यादीच्या गळ्यातील १६ ग्राॅमचे सोन्याचे गंठण व दोन तोळ्याची सोन्याची पोत एकूण १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने अंगावरून आरोपीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या डाव्या पायाला दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच केसाला धरून तिचे डोके गेटवर आदळल्याने जखमी झाली. पीडितेच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी राजू रावसाहेब नादरे, सुरेश रावसाहेब नादरे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, सपोनी सुनील गोपीनवार, फौजदार सविता बोधनकर हे करीत आहे.

Web Title: Oppression by showing job lure; Filed charges against two brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.