..तर होईल राज्यातील आंध, आदिवासींची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:42 AM2018-06-10T00:42:29+5:302018-06-10T00:42:29+5:30
आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.
हिंगोली येथे आंध, आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाºयांची एक दिकदिवसीय परिषद घेतली. अध्यक्षस्थानी लक्ष्मण कुरुडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे, उत्तम इंगळे, संभाजी सरकुंडे, आरती फुपाटे, उद्घाटक प. पू. श्री राष्टÑसंत फुलाजी बाबा यांची उपस्थिती होती.
टारफे पुढे म्हणाले, राज्यामध्ये आंध आदिवासी समाजाची संघटना असणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक न्याय व न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक निधी उभा करुन आंध आदिवासी कर्मचारी हक्काचे संरक्षण करणेही तेवढेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रा. डॉ. राजेश धनजकर, प्रा. माधव सरकुंडे, सुरेश धनवे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन साहेबराव बळवंते, गुहाडे यांनी केले. आभार दत्ता नांदे, डॉ.सतीश पाचपुते यांनी मानले.