हिंगोलीत २ लाख रुग्णांची मौखिक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:40 PM2017-12-31T23:40:59+5:302017-12-31T23:41:06+5:30
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून तब्बल २ लाख ६१ हजार १०५ रुग्णांची मौखिक तपासणी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोहिम राबविण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली :जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून तब्बल २ लाख ६१ हजार १०५ रुग्णांची मौखिक तपासणी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोहिम राबविण्यात आली होती.
सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनतेकडे वळली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून ३० वर्षावरील स्त्री व पुरुषाची मौखिक तपासणी केली. मोहिम १ डिसेंबर पासून सुरु करण्यात आली असून, २४ आरोग्य केंद्रांतर्गत त्या- त्या गावात मोहिम राबवून रुग्णांची मौखिक तपासणी केली. यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थानी परिश्रम घेतले. तर हिंगोली जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण करण्यात आले आहे. तसेच धार्मिक कार्यक्रम असणाºयाही ठिकाणी स्वतंत्र तपासणी कक्षाची स्थापना करुन रुग्णांची मौखिक तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांमध्येही जनजागृती झाल्याने बºयाच गावातील रुग्ण तपासणी करुन घेत होते. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणीही तपासणी केली. यासाठी मुख्यकार्यकारी अधीकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, आरोग्याधीकारी डॉ. राहूल गीते, जिल्हा हिवताप अधीकारी डॉ. गजानन चव्हाण, जी. बी. जोगदंड, एस.आर. रुणवाल, देशमुख, राजेश कत्रुवार, अविनाश गायकवाड, प्रशांत तुपकरी यांच्यासह आरोग्य विभागातील आदी कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.