आदेशानंतरही चुकारे मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:40 AM2018-09-28T00:40:11+5:302018-09-28T00:40:31+5:30
हिंगोली तालुका-खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखा परिक्षकांच्या तपासणीत समोर आले आहे. यासाठी संघाच्या व्यवस्थापकास वैयक्तिक जबाबदार धरून संबंधिताने शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्याचा आदेश दिला असला तरीही रक्कम मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोली तालुका-खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखा परिक्षकांच्या तपासणीत समोर आले आहे. यासाठी संघाच्या व्यवस्थापकास वैयक्तिक जबाबदार धरून संबंधिताने शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्याचा आदेश दिला असला तरीही रक्कम मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड आहे.
सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील शंकर गंगाराम गाडे, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवराम गणपती जगताप, पहेणीचे विठ्ठल पांडुरंग करंडे यांनी सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रार करून सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे म्हटले होते. या तक्रारकर्त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे नाफेडच्या केंद्रावर खरेदी-विक्री संघाकडे सोयाबीन विकले होते. त्यामुळे सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी विशेष लेखा परीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था पणन यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल मागविला होता. तो सादर झाल्यानंतर संघाचे व्यवस्थापक प्रकाश नारायण पवार हे गैरव्यवहारास वैयक्तिक जबाबदार असून त्यांच्याकडून सदर रक्कमा वसूल करावी, असा स्पष्ट अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे यातील तक्रारदारांची रक्कम दहा दिवसांच्या आत अदा करून त्याचा अनुपालन अहवाल देण्यास सहायक निबंधकांनी बजावले होते. अन्यथा गंभीर कारवाईचा इशाराही दिला होता. दरम्यान, २७ आॅगस्ट २0१८ रोजी गिरजाबाई झाडे यांनीही चुकारे मिळाले नसल्याची तक्रार केली होती. त्यांची रक्कम देण्यासही बजावलेले आहे.
या आदेशानंतरही खरेदी-विक्री संघाने या शेतकºयांना कोणतीच रक्कम अदा केली नाही. त्यामुळे पुन्हा हे शेतकरी न्यायासाठी झगडत आहेत. खरेदी-विक्री संघातील गैरव्यवहाराची मागील अनेक दिवसांपासून बोंब सुरू असली तरीही यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.