शाळाबाह्य मुलांसाठी शोधमोहीम राबविण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:43 AM2021-02-26T04:43:19+5:302021-02-26T04:43:19+5:30
हा शोध घेताना ग्रा.पं., पालिका, मनपातील जन्म-मृत्यूच्या नोंदीचा वापर करण्यासही सांगितले आहे, तर कुटुंब सर्वेक्षण, मूळ वस्तीतून अन्य वस्तीत ...
हा शोध घेताना ग्रा.पं., पालिका, मनपातील जन्म-मृत्यूच्या नोंदीचा वापर करण्यासही सांगितले आहे, तर कुटुंब सर्वेक्षण, मूळ वस्तीतून अन्य वस्तीत तात्पुरते स्थलांतर, शाळा असणाऱ्या वस्तीत अन्य वस्तीतून स्थलांतर आदी मुद्दे विचारात घेण्यासही सांगितले आहे. गावाबाहेरची पालं, बांधकामे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, फुटपाथ, भिक मागणारी बालके, भटक्या जमातीची, लोककलावंतांची वस्ती, तेंदूपत्ता तोडणारी, विड्या वळणाऱ्या कामगरांची मुले आदींच्या शाळाप्रवेशाची माहिती या मोहिमेत घ्यावयाची आहे. अशा मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे बालवाडी ते सहावीपर्यंतच्या वर्गात प्रवेश द्यावयाचा आहे. यासाठी राज्यपातळीपासून ते तालुकास्तरापर्यंत विविध अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शिक्षण व महिला बालकल्याण विभागाने संयुक्त काम करायचे आहे. गाव, केंद्र, विभाग अशा जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
२६ फेब्रुवारीपासून तालुका स्तरावर नियोजनाची बैठक घ्यावयाची आहे. १७ रोजी केंद्रस्तरावर व गावस्तरावर बैठक घ्यायची आहे. १ ते १० मार्च या कालावधीत या बालकांचा गाव, वाडी, वस्ती, शहरात शोध घ्यावयाचा आहे.